स्पर्धेच्या युगात शिकेल तोच टिकेल – मुरलीधर जाधव

स्पर्धेच्या युगात शिकेल तोच टिकेल - मुरलीधर जाधव

उदगीर (एल.पी.उगीले) : नवतंत्रज्ञान आणि विज्ञान युगात शिक्षणाला अनन्य साधारण महत्व असून येथे प्रत्येक क्षेत्रात सातत्याने स्पर्धा चालूच असते. कृषी, शिक्षण , संशोधन , तंत्रज्ञान असो की अन्य कुठलेही क्षेत्र असो, तेथे प्रत्येकाची पुढे जाण्याची चढाओढ सुरूच असते. तर इतरांपेक्षा नवीन काहीतरी करण्याची प्रत्येकामध्ये स्पर्धा लागलेली असते. अशा स्पर्धेच्या युगात जो शिकेल, तोच टिकेल. असे मत रिझर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केली.
स्वामी दयानंद सरस्वती विद्यालय भाकसखेडा पश्चिम येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्षी दि.ली. होळीकर प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ जाधव हे होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तांबे , ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव तथा रिझर्व बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत बिरादार, ग्रंथ मित्र दीपक बलसुरकर, गुंडप्पा पटणे, सेवानिवृत्त सुभेदार बाबुराव सोमवंशी, प्रसिद्ध उद्योजक प्रकाश साखरे, वीरभद्र स्वामी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
गेल्या आठ वर्षापासून चालू असलेल्या या पुरस्कार वितरणाचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अवनी वीरभद्र स्वामी हिच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव बिरादार यांनी केले. यावेळी भाकसखेडा पश्चिम येथील स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या शाळेतील एसएससी मार्च 2022 मध्ये गुणानुक्रमे प्रथम- घाटगे श्रद्धा राम, द्वितीय- मोरे गणेश दयानंद, कांबळे वैजयंती सीताराम आणि तृतीय बेलकुंदे असुमती संग्राम यांना प्रथम येणाऱ्या 1000रुपये, द्वितीय येणाऱ्या 750 रुपये, तर तृतीय येणाऱ्यास पाचशे रुपये रोख व सर्वांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि देव तेथेची जाणावा हा ग्रंथ , शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी अवनी वीरभद्र स्वामी हिच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बिरादार यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन आर. पी. गायकवाड यांनी केले तर खंडेराव शिंदे यांनी आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!