“ग्रंथालय शाळेच्या दारी” नियोजनासाठी शिक्षणाधिकारी नागेशजी मापारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.
लातूर (एल.पी.उगीले) : ग्रंथालय चळवळ व वाचक सभासद वाढविण्यासाठी ” ग्रंथालय शाळेच्या दारी ” हा उपक्रम राबविण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागेश मापारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांची उपस्थिती होती.या बैठकीत माध्यमिक व जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाचक सभासद करणे या साठी ” ग्रंथालय शाळेच्या दारी ” या उपक्रमाबाबत नियोजन करण्यात आले.या बैठकीस विजय मिरकले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर. राम मेकले, अध्यक्ष मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ, औरंगाबाद. हावगीराव बेरकीळे अध्यक्ष, जिल्हा ग्रंथालय संघ, लातूर. तसेच ग्रंथालय तांत्रिक सहाय्यक हरिश्चंद्र डेंगळे,ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा.मारोती सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
