राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्री धडक कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्यविक्री धडक कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उप आयुक्ता श्रीमती उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव गो. राऊत, राउशु, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१/१२/ २०२२ वर्षाअखेरीच्या पार्श्वभुमीवर लातूर जिल्हयात जेवळी, ता. औसा, पळशी, वसंतनगर तांडा, ता. रेणापुर, लांबोटा मोड, ता. निलंगा येथे दि. २७/१२/२०२२ पासून विभागामार्फत अवैध मद्या विरुध्द एकूण ८ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये एक दुचाकी वाहनांमध्ये अवैध दारुची वाहतूक करीत असतांना अवैध दारुसह पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयांमध्ये २६ लिटर देशी दारु, १२०० लिटर रसायन, ४५ लिटर ताडी व एक मोटरसायकल असा एकूण रु. ११५९५०/- रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरच्या कारवाईमध्ये अधीक्षक राउशु, लातूर केशव राऊत, निरीक्षक – लातूर विभाग आर. एम. बांगर, निरीक्षक उदगीर विभाग, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. – माटेकर, अमोल शिंदे, स्वप्नील काळे, ए. बी. जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार, हनमंत मुंडे, संतोष केंद्रे, एकनाथ फडणीस यांनी सहभाग नोंदविला.

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!