रेणापूर नगरपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी आ.कराड यांच्या प्रयत्नातून १० कोटीचा निधी मंजूर
लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर नगरपंचायतीच्या नियोजित इमारत बांधकामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दहा कोटी रुपयाचा निधी २६ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर केला आहे. रेणापुर तालुका होऊनही ग्रामपंचायतच अनेक वर्ष असल्याने अपेक्षित हवा तसा कधीच विकासाची कामे झाली नव्हती. रेणापुरला नगरपंचायत अस्तित्वात आली आणि सर्वांगीण विकासाची खऱ्या अर्थाने दालने खुली झाली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रेणापूर शहराचा मूलभूत सुविधेसह गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपये खर्चाचा सर्वांगीण विकास विविध योजनेच्या माध्यमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक अकनगिरे यांनी घडून आणला.
सर्व सोयीने युक्त सुसज्ज अशी रेणापूर नगरपंचायतीची इमारत व्हावी यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने नियोजित या इमारती करिता शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्याची कामे,नाली बांधकाम, विविध समाजाची सभागृहे, गरजूंना घरकुले, अग्निशामन इमारत, समशानभूमी संरक्षण भिंत यासह विविध विकास कामाकरिता कोट्यावधी रुपयाचा निधी आणून प्रत्यक्ष विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत.
सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री मा. गिरीश महाजन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांचे रेणापूर नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, सो आरती राठोड, चंद्रकांत कातळे, दत्ता सरवदे, राजू आलापुरे, विजय चव्हाण, महेश गाडे, शेख अजीम, श्रीकृष्ण मोटेगावकर, अच्युत कातळे, मारुफ आत्तार, उत्तम चव्हाण, संतोष राठोड, उज्वल कांबळे, सचिन शिरसकर, योगेश राठोड, राजू रायवाडे, उत्तम घोडके, दिलीप चव्हाण, रमा चव्हाण, हनुमंत भालेराव, लखन आवळे, गोविंद राजे, नंदकुमार बंडे, रमेश वरवटे, रफिक शिकलकर, प्रमोद फटाले, सुरज फुलारी, मनोज चक्रे यांच्यासह रेणापुर शहरातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
