प्रभा आयुर्वेद रथयात्रा 30 डिसेंबर रोजी अहमदपूर येथे

प्रभा आयुर्वेद रथयात्रा 30 डिसेंबर रोजी अहमदपूर येथे

अहमदपूर (गोविंद काळे) : आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रभा आयुर्वेद रथयात्रेला तुळजापूर येथून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा येत्या शुक्रवारी अहमदपूर मध्ये पोहोचणार आहे. सकाळी ०८ ते १० या वेळात शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. गुरुवर्य प्र. ता. जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यात प्रभा आयुर्वेद फाऊंडेशनने २ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान या रथयात्रेचे आयोजन केले आहे. सर्वरोग निदान व पंचकर्म चिकित्सा शिबिर,आयुर्वेदातील निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने, आयुर्वेद दिंडी, प्रदर्शन, आयुर्वेद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या वर्षी ‘हर दिन, हर घर आयुर्वेद’ असा नारा दिला आहे. याच पार्शवभूमीवर ही रथयात्रा अहमदपूर शहरात येणार आहे. 30 डिसेंबर 2022 वेळ दुपारी 03 ते सायं 06 पर्यंत मोफत आयुर्वेदीक रोगनिदान व औषधोपचार शिबीर आयोजित केले आहे.सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती शिबीर डॉ.नरहरी सुरनर 75888 76222,डॉ.संतोष देवकते 96899 99049 यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!