चौकटे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील ढाळेगाव येथील विद्यार्थी परमेश्वर दत्ता चौकटे यांनी MBBS पात्रता परीक्षेत यशस्वीरीत्या गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या बद्दल शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या वतीने शिवसेना तालुका अहमदपूर पदाधिकारी यांच्या वतीने ‘ शिवनेरी’ शिवसेना कार्यालयात नगरसेवक संदिप चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चौकटे यांचे पुढील शिक्षण सोलापूर येथील शासकीय महाविद्यालयात होणार आहे. शिवसेना सचिवपदी पद्माकर पेंढारकर यांची निवड झाल्याबद्दल चौकटे परीवाराच्या वतीने हिंगरुपे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, दत्ता चौकटे, यांची उपस्थिती होती.
