महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय कृषी क्रांतीचे जनक, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. डी.डी.चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, वामनराव मलकापुरे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!