मंगलबाई जाधव यांचे दुखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : तालुक्यातील नागठाणा येथील प्रगतिशील महिला शेतकरी मंगलबाई देविदासराव जाधव यांचे दि. 27 रोजी मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता राहत्या घरी वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दिनांक 27 रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या शेतामध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून लातूर चे आडत व्यापारी व्यंकट जाधव आणि प्रगतिशील शेतकरी सत्यजित जाधव यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
