सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल येथे ख्रिसमस दिवस साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता. अहमदपूर येथे आज दि. २२/१२/२०२२ रोजी ख्रिसमस दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत असलेल्या सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल चे संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी संताक्लौस बनून ख्रिसमस साजरा केला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षांनी येशू ख्रिस्त वरती सविस्तर असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या प्राचार्या सौ. रुथ चक्रनारायण यांनी सविस्तर असे भाषण केले व कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रात्साविक व संचालन प्रा. संभाजी सांगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक प्रा. भरत कानवटे, , प्रा. ऋतिक पोले, प्रा. शेख मोसिन, प्रा. शुभांगी सूर्यवंशी, प्रा. हीना कल्लुरकर, प्रा. ज्योत्सना स्वामी, प्रा. स्नेहा ओझा, प्रा. अंजली बोधनकर, प्रा. आयुषी पोले व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
