अविनाश जगताप शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम…
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल चा चि अविनाश कमलाकर जगताप या विद्यार्थ्यांने लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी 26 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय 14 वर्ष वयोगटात प्रथम स्थान पटकावीत राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत त्याची निवड झाली. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक विशाल सरवदे,इरफान अकोले,अभिजीत बी.एल,शुभम गुंजरगे,मधुकर दासरे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव आदरणीय ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील,पर्यवेक्षक महावीर गोडभरले व पालकांच्या वतीने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
