महात्मा फुले महाविद्यालयात बौद्धिक मालमत्ता अधिकार कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात आ.यक्यू.ए.सी. विभागाच्या वतीने एक दिवशीय बौद्धिक संपदा अधिकार आज (आय आर पी) कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश देसाई यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. राजेश देसाई म्हणाले की बौद्धिक संपदा अधिकार हा आधुनिक काळातील एक महत्त्वाचा अधिकार असून मानवाच्या कल्याणासाठी जे अनेक शोध लावले जातात, त्यांचे श्रेय हे त्या शोधकर्त्यांनाच मिळाले पाहिजे असे म्हणून यावेळी त्यांनी पी.पी.टी. प्रेझेंटेशन च्या माध्यमातून त्यांनी उत्तम, अभ्यासपूर्ण विषय विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत बिरादार पाटील म्हणाले, की बौद्धिक मालमत्ता ही निसर्गाने प्रत्येकाला बहाल केलेली असून मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येक जण आपल्या तारखा नुसार आपल्या बुद्धीनुसार विविध शोध लावू शकतो. या शोधांचे श्रेय हे ज्याचे त्यालाच मिळाले पाहिजे भारतात १९७० साली हा कायदा झाला आणि त्यामुळे पेटंट विषयी लोकांमध्ये जागृती झाली. मात्र अजूनही या कायद्याविषयी लोकांना फारशी माहीती नाही. पेटंट विषयी जागृती करण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयक्यूएसी विभागाचे प्रा. आतिश आकडे यांनी केले , तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन गर्जे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
