अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आज उद्घाटन

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आज उद्घाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील रुई दक्षिण येथे विशेष निवासी युवक शिबिर आयोजित केले असून, त्याचे उद्घाटन आज सकाळी ११ वाजता होणार आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या शिबिराचा उद्घाटन सोहळा आज सकाळी रुई दक्षिण या गावात होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे पदाधिकारी श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे राहणार आहेत, तर नामदेवराव चामले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, तसेच उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड, तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभणार आहे.
‌ ” युवकांचा ध्यास- ग्राम शहर विकास ” हे या शिबिराचे ब्रीदवाक्य असून, या शिबिरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, सरपंच सूर्यकांत बोईनवाड, उपसरपंच भीमाशंकर पाटील, ग्रामसेवक एफ. एम. शेख, विद्यार्थी प्रतिनिधी गायत्री पदमपल्ले, शाळा व्यवस्थापन समितीचे शाम मुकनर यांनी दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!