शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत किराणामालाचे मोठे नुकसान गावकऱ्यांनी केली दुकानदारास मदत
जळकोट (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील किराणा मालाच्या दुकानाला लागलेल्या आगीत नुकसन झाले, यावेळी गावात सरपंचपदी सुनील नामवाड हे निवडून आल्यानंतर मोठ्या उत्साहात मिरवणूक निघाली होती. यातील लोकानी आग विझवन्यासाठी आजूबाजूच्या घरातील पाणी आणून दुकानाला लागलेल्या आगीला विजवण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यात त्यांना यश आले. या घटनेत उत्तम भीमराव केंद्रे यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील किराणा मालाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या घटनेची गावात चर्चा होत होती, नुकसानीमुळे हे कुटुंब रस्त्यावर येणार होते. हे नुकसानग्रस्त कुटुंब रस्त्यावर येऊ नये, म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मदत करण्याचे ठरवले आणि काही व्यक्तींनी मदतीचा हातही पुढे करून सडळ हाताने मदत केल्याने या कुटुंबास आधार झाला.
उत्तम केंद्रे यांच्या किराणा मालाच्या दुकानात पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे. मदत केलेल्या गावातील सर्व नागरिकांचे त्यांनी आभार मानले आहेत. झालेले नुकसान खूप मोठे नुकसान झाले असले तरी दिलेली रक्कम दिलेला मदत त्याहीपेक्षा मोठी आहे. असे बोलताना भावना व्यक्त केल्या. यावेळी मदत करण्याचा पुढाकार राजीव काळे यांच्या संकल्पनेतून आला असून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गुट्टे, नवनियुक्त सरपंच सुनील नामवाड,बाबुराव जाधव ,अशोक जाधव, रामदास केंद्रे,बालाजी आयनाले,दिलीप गुट्टे,सतीश बडगिरे, व्यंकट जाधव , बालाजी गुट्टे, उद्योघक सचिन केंद्रे ,शादुल मुल्ला आदी यावेळी गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
