महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ऑफिस ऑटोमेशन वर कार्यशाळा संपन्न

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ऑफिस ऑटोमेशन वर कार्यशाळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात एक दिवशीय ऑफिस ऑटोमेशन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश तोंडारे उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर प्रास्ताविकात बोलताना प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी आजच्या काळात सॉफ्टस्कीलचे महत्व याबाबत माहिती दिली, आणि आजच्या कार्यशाळेचे उद्देश स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात अ‍ॅड. प्रकाश तोंडारे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना या संधीचा लाभ घेण्यासाठी सूचना दिल्या आणि समाधान व्यक्त केले. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून मुबारक शेख आणि सचिन करपे मास्टरसॉफ्ट सॉफ्टवेअर, नागपूर हे उपस्थित होते. प्रवेश प्रक्रियेसाठी असलेल्या प्रक्रियेची माहिती सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना हँडस ऑन ट्रेनिंग देण्यात आले. सदरील कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी तसेच शहरातील इतर महाविद्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते. सदरील कार्यशाळेसाठी सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट समितीचे प्रमुख प्रा.डॉ.एस.एम.सूर्यवंशी, कार्यालय प्रमुख श्रीमती प्रतिभा गायकवाड तसेच संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.व्ही. आवाळे यांनी प्रमुख भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार यांनी तर आभार प्रा.डॉ.एस.एम.सूर्यवंशी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या समारोपास म.ए.सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ.रेखा रेड्डी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!