तळेगाव केंद्रस्तरीय 50 व्या विज्ञान प्रदर्शनात श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव प्रथम
देवनी (एल.पी.उगीले) : देवनी तालुक्यातील तळेगाव (भो.) केंद्रस्तरीय 50 व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन नृसिंह विद्यालय गुरधाळ येथे केले होते. या विज्ञान प्रदर्शनात श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो ( माध्यमिक गट ) कु. महादेवी धनाजी लद्दे इयत्ता 10 वी हिने सादर केलेल्या “अपारंपरिक ऊर्जेच्या वापरातून ग्रामीण भागाचा विकास” या प्रयोगाने प्रथम क्रमांक पटकावला.
कु. महादेवी धनाजी लद्दे हिची देवणी तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षीका श्रीमती उज्वला कणजे व सुनील क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. महादेवी धनाजी लद्दे व मार्गदर्शक शिक्षीका श्रीमती उज्वला कणजे यांचे अभिनंदन लोकजागृती शिक्षण संस्था वलांडीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील, उपाध्यक्ष आण्णाराव पाटील, सचिव भगवानराव पाटील तळेगावकर,पस.चे माजी उपसभापती शंकरराव पाटील,सरपंच सदाशिवराव पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजीराव पाटील, भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. चे मुख्याध्यापक सुनील क्षीरसागर, सहशिक्षक विनोद माने, ज्ञानोबा रामासने, मोईन सौदागर, भाऊराव बिरादार, अमोल भोसले, बालाजी शिंदे, राजकुमार पटवारी व लिपीक सौ. मिनाक्षी क्षीरसागर, शिक्षकेत्तर कर्मचारी बळीराम वाघमारे, दत्तात्रय बिरादार, दाऊद पठाण यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
