हॉटेल हमारी ‘खेती’ है… इस पर ही हमारा ‘घर’ चलता हैं…!

हॉटेल हमारी 'खेती' है… इस पर ही हमारा 'घर' चलता हैं…!

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

माळेगावच्या जिलेबी शेतीतून

‘ यही हॉटेल हमारी… खेती है … उसमें हम … जिलेबी… भजे… जो भी कुछ बनाते है… उसको बनाना… और बेचना… यही हमारा ‘धरम’ है…! और उसमेंसे जो फायदा… नफा.. मिलता है… वही हमारी मजुरी है… और भाईसाब उसमें जो बचता है… उसमेंसेही हम खाते है… अपना घर चलाते है..!’ अशा शब्दांत माळेगाव यात्रेत हाॅटेल टाकलेले मोहम्मद खय्युम मोहम्मद गौस यांनी आपल्या या व इतर यात्रेतील धंद्याच्या यशाचे रहस्य सांगितले.
माळेगावची यात्रा म्हटलं की… थंडी… अन् थंडीत… गरमागरम जिलेबी… गरमागरम भेजे…हेच डोळ्यासमोर तरळून जाते… म्हणूनच तर हजारो हॉटेल यात्रेत डेरेदाखल होतात… त्यापैकीच एक जिलेबी…भज्यांसाठी सर्वपरिचित असलेले… व… आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) येथून आलेले… व यात्रेत विस्तीर्ण अशा जागे मध्ये हाॅटेल उभारलेले… मोहम्मद खय्युम मोहम्मद गौस हे… आपल्या १० ते १२ माणसांच्या चमुसह… मोठ्या उत्साहान…श्रद्धेने आणि भक्ती भावाने… हाॅटेल चालवीत आहेत… माळेगावच्या या यात्रेत त्यांचे हे हाॅटेल गेल्या ५० वर्षांपासून चालत आलेले आहे… हमारे…दादा‌… परदादा से लेकर आजतक… हम यह धंदा चलाते है… असे म्हणून महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा येथील … वरंगल जिल्ह्यात मेडाराम येथे फार मोठी यात्रा भरते… निजामबाद येथेही आम्ही जातो… आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर … पुणे यासह इतर ठिकाणी यात्रा करीत आम्ही फिरतो.
जेव्हा तेलंगणात आम्ही जातो… तेव्हा तेथे महाराष्ट्रातील काही पदार्थ चालत नाहीत… चालतात ते … दाळमूठ … शेंगदाणा… पापडी… शेव … खारीबुंदी … कलरचे रुखवत … जिलेबी… आणि तिखट तळलेले पदार्थ … तेथे चिवडा आणि गोड पदार्थ चालत नाहीत… विशेष म्हणजे तेलंगणात … महाराष्ट्रा पेक्षा या पदार्थांचे भाव दीडपटीने जास्त असतात… कारण येण्या- जाण्याचा खर्च वाढतो… जागेचं भाडेही तिथेजास्त असतात… पण, महाराष्ट्रात भाडं जास्त नाही… महाराष्ट्रातील यात्रेमध्ये… जिलेबी… भजे… आणि प्रसाद जास्त विकतात… प्रसादामध्ये टिपरे‌. भत्तासे… आणि साखरेचे मुरमुरे चालतात…पेढाही विकला जातो… यावर्षी जत्रेमध्ये आमची जवळपास २० कट्टे साखर… ५-६ कट्टे मैदा… आणि दररोज १०ते १२ किलो… पीठ भजे करण्यासाठी… उपयोगात आणले जात आहे.
गेल्या दोन वर्षापासून… माळेगावच्या यात्रेमध्ये गॅप होता… यावर्षी यात्रेमध्ये आमचा धंदा बराच चालला चालला. .. यावर्षी लोकांचा काही त्रास नाही… पूर्वी मात्र त्रास होता… असे असले तरीही… यात्रेत फुकट्यांचा त्रास न विचारला तरच बरा…! हे फुकटे काय भाव देता ? असे म्हणून एखादा पदार्थ उचलतात… आणि तो पदार्थ हातात घेऊन निघून निघून जातात… यावर आम्ही त्यांना काही बोलत नाही… तू मोठा … तुझा बाप मोठा …तुझी खानदान मोठी … घेऊन जा बाबा… असे म्हणून आम्ही गप्प बसतो… अशा शब्दांत आपल्या व्यवसायातील संयमाची प्रचिती मोहम्मद खय्युम यांनी सांगून… भावनांना मोकळी वाट करून दिली.
एखाद्या यात्रेमध्ये नैसर्गिक वा… इतर कोणत्याही कारणाने नुकसान झाले… तर अशावेळी आपण काय करता… ? असे विचारले असता मोहम्मद खय्युम हे म्हणाले की, … असे प्रसंग येतात… नाही असं नाही…कधी कधी यात्रेची जागा फेल जाते… अचानक वादळ वारं येतं… तुफान पाऊस… मग झाकाझकी करावी लागते … पदार्थ विकले जात नाहीत… जेव्हा असे होते तेव्हा आमचं आर्थिक नुकसान होतं…. मग अशावेळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांचा… आम्हाला पगार द्यावाच लागतो. .. ते खिशातून… हॉटेलमध्ये एकूण १० ते १२ कामगार माणसे आहेत… ते फक्त जत्रेमध्येच काम करत असतात…काम केल्यावर आम्ही त्यांना मजुरी देतो… पगार घेतात. जेवढं काम केलं तेवढीच मजुरी मिळते… जिलेबी आणि भजे तळणार्‍यांना ५०० ते ६०० रूपये मजुरी आहे. शिवाय त्यांना जेवण… चहा… पाणी… आमच्याकडून दिले जाते… जेवणात.. डाळ… भात …खिचडी दिली जाते… यासाठी खास एक आचारीही आम्ही सोबत ठेवलेला आहे.
हॉटेल हमारी ‘खेती’ है, भाईसाब…!
आपल्या या हॉटेलच्या यशाचे रहस्य काय आहे…? असे विचारले असता ते म्हणाले की… हे हॉटेल ६ जणांमध्ये आहे…यात मी स्वतः मोहम्मद खय्युम गौस… दुसरे मुस्तफा शेख …तिसरे शेख रफिक …चौथे शेख अकबर… पाचवे शेख फारूक … आणि अतिक …अशा सहा जणांमध्ये आहे… आम्ही ६जण एका मानाने हॉटेल चालवतो. … लोकांच्या नजरेत हे हॉटेल असले… तरी आमच्या दृष्टीने हे हॉटेल म्हणजे…’ हमारी खेती है… खेती को किसान जैसे संभालता है…उसी तरह हम भी हॉटेल को संभालते है … हमारी इस ‘खेती’ मे… जिलेबी… भजे…तले हुए पदार्थ… पापाडी… और प्रसाद बनाते है …उसकोही बेचते है
… उस मे जो कुछ… मजुरी मिलती है.. उसी मेसीही हम … बाल बच्चों को पढाते है… उनकी परशवरिश करते है… और घर चलाते है …इसी मेहनतसेही
ही खाना खाते है…!’ असे मोहम्मद खय्युम, महंमद गौस यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.
मोहम्मद खय्युम मोहम्मद गौस यांच्या सोबत जिलेबी बनवणारा रफिक…भजे तळणारा अन्सार हे आहेत .. तर नवनाथ वाघमारे… सिद्धार्थ नरवाडे हे कर्मचारी आहेत.

About The Author

error: Content is protected !!