तब्बल दोन वर्षानंतर देवर्जन मार्गे लातूर बस सुरू

तब्बल दोन वर्षानंतर देवर्जन मार्गे लातूर बस सुरू

उदगीर (एल.पी.उगीले) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली उदगीर– लातूर मार्ग देवर्जन ही बस देवर्जन ग्रामस्थांच्या मागणीनुसार उदगीर आगार प्रमुखांनी पुन्हा सुरू केली असून या बसचे देवर्जन मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

उदगीर तालुक्यातील देवर्जन, शंभु उंमरगा, दैठणा, साकोळमोड या भागातील प्रवाशांना लातूरला जाण्यासाठी सोयीची ठरणारी ही उदगीर – देवर्जन- लातूर बस प्रवाशांसाठी वरदान ठरणारी बससेवा आहे. मात्र कोरोना काळापासून गेल्या दोन वर्षापासून ही सेवा बंद होती. या भागातील नागरिकांची ही बस सुरू करण्यासाठी आग्रही मागणी होती.

या प्रवाशांच्या मागणीच्या अनुषंगाने देवर्जनचे नूतन सरपंच अभिजीत साकोळकर यांनी शिष्टमंडळासह वाहतूक निरीक्षक अनिल पळनाटे यांची भेट घेतली. आगार प्रमुख, वाहतूक निरीक्षक यांना सविस्तर गरज लक्षात आणून देऊन बस सुरू करण्याची मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत आगार प्रमुख संदीप साळुंखे यांनी सकाळी साडेसहा व दुपारी दोन या दोन बसेस सुरू केल्या आहेत.

सरपंच साकोळकर यांच्या समवेत युवराज धोतरे, वैजनाथ वाडीकर, विनोद रोडगे, दत्ता खटके, विनोद पाटील, शाहीद मोमीन आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. ही बस सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आगारप्रमुखासमवेत सरपंच व शिष्टमंडळाचे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!