वाडीकर ज्वेलर्स उदगीर येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

वाडीकर ज्वेलर्स उदगीर येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : उद्योग भवन जवळ असलेल्या वाडीकर यांच्या ज्वेलर्स मध्ये नवनिर्वाचित सरपंच प्रमोद काळोजी यांचा सत्कार करण्यात आला. उदगीर तालुक्यातील नामांकित मोघा गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीकडे तालूक्याचे लक्ष लागून होते. या अटितटीच्या निवडणुकीत तरूण तडफदार सरपंच प्रमोद काळजी यांनी बाजी मारली, आणी ते निवडून आले. त्यांचा दांडगा संपर्क व मित्र परिवार मोठा आहे . या अगोदर त्यांनी पंचवार्षिक योजनेमध्ये गावचा उपसरपंच म्हणून पाच वर्ष कारभार सांभाळलेला आहे.कामाच्या जोरावर त्यांनी या निवडणुकीत स्वत: पँनेल टाकून दंड थोपटले होते.जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने केल्यामुळे जनतेने त्यांच्या वर विश्वास ठेऊन याही वेळेस पँनेलला बहूमत देऊन त्यांच्या आईला सरपंच व त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून एकाच घरात दोन पद निवडून दिले.

होतकरू आणि जनतेची सेवा करणाऱ्या सेवकांना निवडून देणे हे सुद्धा योग्य आहे, ही काळाची गरज आहे. हे जनतेच्या लक्षात आल्यामुळे काळोजी याना सरपंचाचा गड सांभाळण्याची जबाबदारी दिली. या यावेळी देखील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करन्यासाठी काळजी यांनी जीवाचे रान करावे, असेच पुढच्या पंचवार्षिक योजनेत सुद्धा काळोजी आणखी तिसऱ्यांदा सरपंच म्हणून पदावर येण्यास पात्र राहतील, यशस्वीरित्या यशाचे शिखर गाठण्यास समर्थ आहेत. अशी चर्चा आहे.आणि जनतेने त्यांच्या वर विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलेत्याबद्दल वाडीकर ज्वेलर्स चे मालक व मित्र अंकुश वाडीकर व अगंद वाडीकर यांनी म्हैसूर पगडी, शाल व शिवकालीन प्रशासन व्यवस्था हे पूस्तक भेट देऊन व पेढा भरवून त्यांचे अभिनंदन व कौतुक करून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका सचिव महेश बिरादार यांनी दूकानी भेट दिल्यामुळे त्यांचा पण सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रसिध्द शिवव्याख्याते शिध्देश्वर लांडगे, प्रा.प्रल्हाद पाटील, प्रा.प्रदिप बिरादार, राजकुमार भैय्या. प्रा.उत्तम राठोड उपस्थित होते. वाडीकर ज्वेलरी मध्ये विविध विशेष कृषी क्षेत्र, राजकीय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील प्राविण्य मान्यवरांचा आदर व सत्कार केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!