जनार्धन जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल.पी.उगीले) : ‘मदत’ या सामाजिक संस्था नागपूर तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज रत्न पुरस्कार देवर्जन येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले कल्लुर येथील सहशिक्षक जनार्धन एकनाथ जाधव यांना देण्यात आला. नागपूर येथे 26 डिसेंबर रोजी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जनार्धन जाधव यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना दिला असून यापूर्वीही त्यांनी तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागीय पातळीवरील शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल आमदार संजय बनसोडे , मुख्याध्यापक एस आर स्वामी, प्रा. शिवराज कांबळे, कोंडीबा जाधव, माधव कांबळे, सरिता जाधव, सरपंच लक्ष्मण कुंडगीर,शिंदाळकर सर, केंद्रे सर, किरण कलुरकर आदींनी अभिनंदन केले आहे.
