गणित विषयातील राष्ट्रीय प्रश्नमंजुषा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय व मराठी विज्ञान परिषद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील गणित विषयाची ऑनलाईन प्रश्नमंजुषा चाचणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशातून 389 विद्यार्थी उपस्थित होते. मॉरिस अल्मोडा, गोवा विद्यापीठ, गोवा व संभाला मोतीराम पोळ स्वारातीम, नांदेड या दोघांना प्रथम परितोषिक अनुक्रमे 1500 रु. व प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक के.प्रीती जानकी अंमल कॉलेज, शिवकाशी, तामिळनाडू व चौधरी पल्लवी स्वारातीम, नांदेड यांना एक हजार रुपये प्रत्येकी व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय पारितोषिक कुरील सोनल सावंत स्वारातीम, नांदेड यांना 1000 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मराठी विज्ञान परिषद, उदगीरचे अध्यक्ष प्रा.डॉ. शिंदे संजय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, गणित विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.डी.करंडे, प्रा.प्रशांत वाघमारे आणि मराठी विज्ञान परिषद, उदगीर चे उपाध्यक्ष प्रा.डॉ.राहुल अलापुरे यांनी परिश्रम घेतले.
