श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निरुडे आदित्यचे यश
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील प्रयोग मोठ्या गटातुन प्रथम येण्याचा मान श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या निरगुडे आदित्य या विद्यार्थ्यास मिळाला आहे , विळेगाव केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री योगेश्वरीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रयोग मोठ्या गटातून प्रथम आलेला आहे.
इयत्ता नववीच्या निरुडे आदित्य विजयकुमार या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांचा मित्र काठी (life saving stick) हा प्रयोग सादर केला. या विद्यार्थ्याला कस्तुरे रवींद्र आणि हुमनाबादे नागनाथ यांनी मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थ्याचे संस्था सचिव यशवंतराव पाटील, संचालक अभिजित पाटील, आदित्य पाटील, मुख्याध्यापक हरकंचे राजकुमार, शंकर पाटील, सुर्यवंशी , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
