सुभाष राठोड नागलगाव ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार स्वीकारला
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली, या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाचे उमेदवार सुभाष मुन्ना राठोड यांनी संघर्ष ग्राम विकास पॅनलमधून थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुभाष राठोड यांनी 105 मतांनी ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला. 30 डिसेंबर रोज शुक्रवारी नागलगाव ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुभाष राठोड यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पण करून सुभाष राठोड यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
सरपंच सुभाष राठोड यांनी गावातील नागरिकांचा सत्कार केला. त्याच बरोबर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राजीव वाघे,माजी सरपंच बस्वराज बाळे,मतकट्टे गुरुजी,प्रा सूर्यकांत चवळे,राम गोडबोले, माजी चेअरमन बसू बाळे, माजी चेअरमन गोविंद पाटील,गणपत पाटील, मल्लिकार्जुन शेरे,अनिल गुरमे,रमा बिरादार,पोलीस पाटील अंकुश वाघे,बालाजी बिरादार,सदाशिव शेरे,राजू गुंडरे, ब्रह्मदेव पवार,विकास चव्हाण, लक्ष्मण चव्हाण,संजय चव्हाण, दिलीप राठोड,राजू राठोड,पत्रकार सुधाकर नाईक,यांच्यासह गावातील नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
