तुझे हात पकडके घुमाऊं…तू गोल गोल घुम… शकलक बुम बुम….!

तुझे हात पकडके घुमाऊं…तू गोल गोल घुम… शकलक बुम बुम….!

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

यात्रेतल्या आकाशी पाळण्यातून

लोहा,
माळेगावच्या यात्रेत लहानांसह सर्वस्तरातील व्यक्ती आकाशी पाळण्या बसून… आकाशाला गवसणी घालाविशी असे त्यांची सहज सुलभ भावना असते… यातील नवयौवनातले… आकाशी पाळण्यात बसल्यानंतर… आकाशी पाळण्याचा दांडा पकडून’
तुझे हात पकडके घुमाऊं
**तू गोल गोल घुम **
शकलक बुम बुम..’
अशी गुणगुण्याची वातावरण निर्मिती माळेगावात झालीय.
लोहा तालुक्यातील माळेगावात भरलेल्या दक्षिण भारतातल्या प्रसिद्ध यात्रेमध्ये… २ मोठे… तर २छोटे… असे एकूण ४ आकाशी पाळणे दाखल झालेले आहेत… अलिगड … अंबाजोगाई… परभणी सह.. इतर ठिकाणाहून हे आलेले आकाशी पाळणे… बच्चे कंपनीची पाळण्यातून आकाशी सैर करत आहेत… तसेच या ‘आकाशी’ पाळण्यात बसण्यासाठी महिला… पुरुष… बायकांसह रांग लागत आहेत… टोलेजंग असे आकाशी पाळणे… हे कोणी ६०रुपये…तर ७० रुपये …तर कोणी ८० रुपये या तिकिटाच्या दराने आकाश पाळण्यात बसवत आहेत.
६५ फूट उंचीचा आकाशी पाळणा
रात्रीच्या वेळी माळेगावचे दर्शन हे मोठे लोभस आहे … हे दृश्य यात्रेला शोभा देतोय…त्यात हे आकाशी पाळणे… रंगीबेरंगी… विद्युत रोषणाईने नटलेले असते… जमीनीपासून कोणते४० फूट तर कोणते ६५ फूट…तर एक ८० फूटाच्या उंचीवर आहे… याम आकाश पाळण्यासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाचे वजन ३२ टण…६५ टण आणि ७५ टन एवढे क्रमशः आहे.

*गुजरातची निर्मिती आहे… * ‘आकाशी पाळणा…!’
आकाशी पाळणा हा यात्रेत बच्चे कंपनीचा आकर्षण बिंदू ठरलेला आहे … पालक तिकीट काढून आपल्या मुलाला आकाशी पाळण्याच्या झुल्यात बसवतात… कधी वाटले तर मुलांच्या सोबत तर बसतात… आकाशी पाळण्याचे हे झुले वेगवेगळ्या संख्येचे आहेत … मोठ्या आकाशी पाळण्याला २६ झुले आहेत… तर लहान आकाशी पाळण्याला २४ झुले आहेत…
पण हे आकाशी पाळणा आणि झुले गुजरात मध्ये तयार होतात… याची किंमत लाखोंच्या वर असते… त्यामुळे आकाशी पाळण्याची खरेदी करणे … हे सर्व सामान्यांना परवडणारे नाही… ज्यांच्याजवळ ‘ब्रेक डान्स’… यासारखे इतर करमणुकीचे माध्यम आहेत… त्यातून त्यांना उत्पन्न जास्त होत असल्यामुळे… त्यांना आकाशी पाळणे खरेदी करणे परवडते… कारण, आकाशी पाळण्यात बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे… पण , त्याला खर्चही तेवढाच आहे… असे असले तरीही सर्व खर्च जाऊन आम्हाला बऱ्यापैकी कमई पदरात पडते …!
आमचे इथे येण्याचे हे पहिलेच वर्ष आहे… असे अलिगड येथील मुकेश सेठ यांनी सांगितले.त्याच बरोबर यात्रेमध्ये असिफ भाई अंबाजोगाई यांनी, महबूब भाई परभणी, तर माळेगावच्या अरुण पांचाळ यांनी आकाशी पाळणे यात्रेमध्ये बच्चे कंपनीच्या मौज मजेसाठी उपलब्ध केले आहेत.

तू गोल गोल घुम…!
सकाळी ११ वाजले की, हा आकाशी पाळणा आकाशामध्ये गोल गोल फिरायला लागतो… तो सायंकाळी ७ वाजेपर्यंत नॉन स्टॉप चालूच राहतो… यामध्ये आकाशी पाळण्यातील झुल्यामध्ये बसल्यावर… तो चालू झाला की… आकाशी पाळणा गोल गोल फिरू लागला की… अनेकांच्या पोटात सळकन होते… त्यांच्या हृदयाची धडधड वाढते… वर चढताना मध्यभागी गेल्यावर …आणि खाली उतरताना मनाची स्थिती भर कटल्यासारखी होते … कोणाला उलट्या होतात…तर कोणाला चक्कर येते… तर कोणाला खालची जमीन गोल गोल फिरल्यासारखी दिसते… अशा स्थितीमध्ये हे तरुण-तरुणी.. यौवनात पदार्पण कलणारे तरूण… झुल्याला असलेल्या लोखंडी दांड्याला पकडून म्हणतायत-
तुझे हात पकड के घुमाऊं
तू गोल गोल घुम
शकलक बुम बुम..!’
मग काय..? माळेगावातील आकाशी पाळण्यासह पंचक्रोशी… गोल गोल घुमू लागते… त्याचा आनंद …बच्चे कंपनीसह सर्व स्तरातील व्यक्ती लुटत आहेत…!

About The Author

error: Content is protected !!