निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा

निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करा

जिल्हा काँग्रेस ची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील किनगाव कोपरा येथे स्थानीक प्रशासन ग्रामपंचायत हद्दीत वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी काही लोकांवर व महीला भगिनीवर गुन्हे दाखल केले असून याप्रकरणात पोलिसांनी निपक्षपातीपणे सखोल चौकशी करून कुणावर अन्याय होणार नाही व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे यावर पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळास दिली आहे.

याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे शहरं जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड प्रमोद जाधव, औसा तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, कॉंग्रेस मागासवर्गीय सेल चे जिल्हाध्यक्ष अँड बाबासाहेब गायकवाड, माध्यम विभागाचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगने, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रविण सूर्यवंशी, प्रविण पाटील, वी.जी.एन. टी सेल चे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, प्रा. ओमप्रकाश झुरूळे, प्रविण पाटील, प्रा. सुधीर पोतदार, सत्यनारायण पाटील, महेश काळे,कुणाल वांगज उपस्थित होते.

About The Author