शिवाजी महाविद्यालयाला आ. काळे यांची भेट

शिवाजी महाविद्यालयाला आ. काळे यांची भेट

उदगीर (प्रतिनिधी) : किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी आ. विक्रम काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सत्कार करण्यात आला, सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष नामदेव चामले, सदस्य गुंडेराव पाटील, माधवराव पाटील, अजित पाटील, विशाल पाटील, तानाजी पाटील माजी बोर्ड मेंबर, प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार प्रसंगी आ. विक्रम काळे म्हणाले शिक्षक, प्राध्यापक यांच्या प्रश्नासाठी माझा लढा अजीवन राहील .एवढेच नव्हे तर सध्या पेन्शन योजनेचा प्रश्न गाजत आहे. मी शासनाला ठणकावून सांगितलेलं आहे की, जोपर्यंत शिक्षक, प्राध्यापकांना पेन्शन मिळणार नाही. तोपर्यंत मी माझे पेन्शन घेणार नाही. हेही त्यांनी या ठिकाणी सांगितले.

आजपर्यंत अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न मी मांडलेले आहेत आणि ते मंजूर करून घेतलेले आहेत .याहीपुढे अशाच पद्धतीने हा लढा मी कायम चालू ठेवीन, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे यांनी मानले. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!