इनरव्हील क्लब उदगीर तर्फे तोंडार पाटी येथील वस्तीत राहणाऱ्या सोलर पॅनलच्या माध्यमातून मोफत लाईटची सुविधा
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील तोंडार पाटी येथील ऊस तोड कामगार व वस्तीत राहणार्या लोकांना लाईटची सोय नसल्याने अनेक अडचणी येतात, हे जाणून उदगीर इनरव्हील क्लबने सोलर पॅनलच्या माध्यमातून मोफत लाईटची सोय करून दिली.हा प्रोजेक्ट इनरव्हील क्लब उदगीरच्या सदस्या सौ.अपेक्षा शेटकार यांनी आपला मुलगा वैभव प्रमोद शेटकार यांच्या स्मरणार्थ राबवला. वैभवच्या आठवणीतून गरजु लोकांचे जीवन प्रकाशमय होत आहे, याचे समाधान आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, उपाध्यक्षा सौ. स्वाती गुरुडे, सचिव सौ. शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार,एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार व प्रोजेक्ट प्रमुख सौ. अपेक्षा शेटकार याच बरोबर उषाताई भालेराव, जहांगीर पटेल या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन व मदत करणारे प्रा. बिभीषण मद्देवाड यांची उपस्थिती होती.
