पाऊस खूप पडला… तरीही थंडी नाही… अन् उबदार कपड्यांचा धंदाही नाही…?
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
यात्रेतली कापड लाईन
लोहा,
पौष अमावास्येला सुरू होणाऱ्या दक्षिण भारतातल्या माळेगाव यात्रेचे सुरुवात ही थंडीनेच होते… पण यावर्षीही वातावरण बदलामुळे… थंडी नाही …थंडी नाही म्हणून … गरम कपड्यांची खरेदी … यात्रेकरू करीत नाहीत… त्यामुळे गरम कपड्यांची बाजारपेठ थंड … थंड आहे … अशी प्रतिक्रिया स्वेटर विक्रेते सय्यद इम्रान अमजद खान यांच्यासह सर्वच व्यापा-यांनी दिली.
माळेगावच्या यात्रेमध्ये कपड्यांची खरेदी… विक्री कोट्य- वधींच्या घरात होते … मुख्य रस्त्याला कपड्यांचे असंख्य दुकाने थाटलेली आहेत… यामध्ये सर्व प्रकारची उबदार कपडे तर मिळतातच मिळतात … तसेच यात्रेकरू गरम … ऊबदार लोकरीचे कपडे… घोंगडी… ब्लॅंकेट … चादरी… आदि खरेदी करण्यासाठी यात्रेकरूंची झुंबड उडत असते.
यावर्षी पाऊस भरपूर झाला… त्यामुळे डिसेंबर…जानेवारी मध्ये किती थंडी वाजते की न काय नाही की …? तिची काही मर्यादा नाही…? अशा प्रकारची भीती यात्रा सुरू होण्याच्या अगोदर अनेकांना वाटत होती… पण, ईजेव्हा प्रत्यक्षात यात्रा सुरू झाली… अन् वातावरण बदलू लागले…. आकाशामध्ये थोडेसे ढगाळ वातावरण सुरू झाले… कधी ढगं असायचे… तर कधी आकाश निरभ्र असायचे… पण थंडी कशी ती फिरकलीच नाही…! यात्रेमध्येच काय …? सगळीकडेच थंडी कोणालाही जाणवली नाही… मग गरम… उबदार…अन् महागाची कपडे कोण खरेदी करणार…?
या गरमा… गरम… वातावरणाने… उबदार कापडांच्या व्यापाऱ्यांना… आर्थिक दृष्ट्या थंड केले … त्यांचा धंदा ब-यापैकी बसवला… कडाक्याची थंडी पडली तरच… आमचा धंदा गरमा… गरम चालतो …’ इस साल सर्दी नही है …अगर सर्दी रहती थी तो माल बिकता था… कुछ कमाई नही हुई… इस साल कुछ भी धंदा नही हुआ…!हर आदमी आपणा जब देखकर खर्चा कर रहा है… उनके पास भी पैसा नही है …!’
अशी प्रतिक्रिया नांदेड येथील सय्यद इम्रान या व्यापा-यांने दिली… यांचे यात्रेत दोन दुकाने आहेत… पण विक्री काही फारसी झाली नाही… तीन चार वर्षानंतर ते यावर्षी यात्रेला आलेले आहेत…. दरवर्षी ते दोन-तीन दिवस यात्रेत राहतात … पण यावर्षी धंदा झाला. नसल्यामुळे… व आता आता तरी काही तरी धंदा होईल …या अपेक्षेमुळे ते अजूनही यात्रेतच तळ ठोकून आहेत… त्यांच्याकडे लुधियानाहून खरेदी केलेले स्वेटर… जॅकेट …आहेत ते रुपये तीनशे पासून पाचशे रुपये पर्यंत उपलब्ध आहेत… गिऱ्हाईक नसले तरीही जागेचे सात ते आठ हजार रुपये भाडे त्यांना द्यावे लागणार आहेत.
‘नेटवर्क’ चा फटका व्यापाऱ्यांना बसला…!
कमीत कमी १० ते १२ लक्षाच्या घरात असलेल्या यात्रेकरूंच्या मालेगावाला … यावर्षी नेटवर्कचा चांगलाच फटका बसला…नेटवर्कचा मोठा लपंडाव होता… दोन मिनिटे नेटवर्क आले की दोन तास गायब व्हखयचा… अशी नेटवर्कची हजेरी यात्रेत होती…तोही कुठे असायचा…तर कुठे अजिबात नसायचा…? त्यामुळे फोन पे वर पेमेंट करणाऱ्याची खरेदी होऊ शकली नाही … असा सूर नांदेड च्या शिवानंद सूर्यवंशी या व्याप-याने आळवला.
याचबरोबर व्यापाऱ्यांच्या मालाची चलता चलता उचलेगिरी करणारे… अनेक उचले …यावर्षी व्यापाऱ्यांना चांगलीच आर्थिक दृष्ट्या आपले हात घाईला आणले…१०ते१२ जणांचं टोळकं दुकानावर यायचं… आणि एकेक जण हे कापड दाखवा… ते कापड दाखवा… असे म्हणायचे ..ध
व एकेक करून कोणी काही बाही स्वेटर…उचलून पसार व्हायचे… असा अनुभव अमजद खान यांनी सांगितला.
चोरीच्या सत्रातही वाढ झाली…?
गरम कपडे विक्रेत्यांना… यावर्षी यात्रेतल्या चोरट्यांनी चांगलाच हात दाखवलाय…पहाटे ३च्या सुमारास… कापड दुकानदार झोपल्यानंतर …त्यांच्या दुकानात शिरून… कपड्यांचे बांधलेले गट्टे पसार केले… असल्याचे अल्ताफ जर्दी आणि सलीम सर्दी हे दोन व्यापारी जिल्हा लातूर यात्रेत आलेले आहेत ….
ते म्हणाले की … त्यांच्या दुकानातून १० हजाराचा माल… ज्यामध्ये नाईट पॅन्ट… जीन्स पॅन्ट …शर्ट… टॉप… बर्मुडा… धोती आदींचे गठ्ठे बांधलेले होते… ते गठ्ठे चोरीला गेले… तर सलीम जर्दी यांच्या दुकानातून गुंडाळून ठेवलेले कपड्यांचे बंडल … त्यातील साधारणत: ३ हजारांचे जॅकेट चोरीला गेले… या दोघांनाही आपल्या दुकानातील चोरीची तक्रार माळेगावच्या पोलीस चौकीलाला दिलेली नाही … कारण पोलीस स्टेशन यात्रेमध्ये काही करू शकत नाही… पण हा चोरीचा प्रकार चुकीचा आहे .. .या शिवाय इतर कितीतरी व्यापाऱ्यांच्या …चोरी झाल्या असतील पण त्यांची दाद ना फिर्याद…?
व्यापाऱ्याला जमावाने मारले…?
माळेगावची यात्रा उचलायची आहे… हवसे… गवसे… नवसे… शेतकऱ्यांची… व्यापाऱ्यांची… मजूरदारांची…यासह सर्व स्तरांतील लोकांची आहे… हे आपल्याला माहिती आहे… पण जमावाने येऊन मारणाऱ्यांचीही… ही यात्रा आहे… हे आता या यात्रेची ओळख होत आहे …याचे कारण म्हणजे ….नांदेडचे सय्यद जरिफ हे व्यापारी… आपल्या कापडाचे दुकान टाकून माळेगावात बसले होते… ५- २५जणांचा जमाव आला …आणि कपडे खरेदी वरून वाद केला… त्यात सय्यद जरिफला मारायला सुरू केले…मारले… तेव्हा बाजूला असलेल्या लोकांनी येऊन त्यांना वाचवले…असे त्यांनी ‘आपबिती’ सांगितले.
