ज्ञानदीप अकॅडमीत एचआयव्ही विषयी जनजागृती व तपासणी अभियान
अहमदपूर (गोविंद काळे) : ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र, अहमदपूर येथे एचआयव्ही विषयी जनजागृती व तपासणी अभियान घेण्यात आले असुन विविध मान्यववरांनी या विषयरावर मार्गदर्शन केले “स्पर्श” द एम्पाटीक टच सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र, अहमदपूर येथे एचआयव्ही, एड्स या विषावर मार्गदर्शन करण्यात आले.
अहमदपूर येथील सिव्हिल हॉस्पिटलचे समुपदेशक गणेश स्वामी व प्रयोग शाळा तंत्रज्ञ गणेश सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्याना एचआयव्ही विषयी संभ्रम व घ्यावयाची काळजी या विषयांवर मारगदर्शन केले व नंतर इच्छुक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्राचे संचालक उध्दव इप्पर हे होते सूत्रसंचलन नितिन गुट्टे यांनी केले तर आभार राम मेजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र मेजर, महिला प्रशिक्षक अर्चना करपे, ऋतुजा बनकर, संदीप नरोटे, निखिल कोळी यांनी परिश्रम घेतले या शिबिराचा लाभ 400 विद्यार्थ्यांनी घेतला.
