प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही पेन व फळांचे वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय प्राचार्य तथा महाराष्ट्रातील थोर समीक्षक व लेखक डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुई दक्षिण येथे सुरू असलेल्या एन.एस.एस. कॅम्प मध्ये भूगोल विभाग प्रमुख डॉ.डी.एन. माने यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना फळे, वही व पेन चे वाटप करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाचे विशेष रूई दक्षिण येथे सुरू असून, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भूगोल विभाग प्रमुख डॉ.डी.एन.माने यांच्या वतीने स्वयंसेवक विद्यार्थ्यांना वही, पेन व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एन.एस.एस. चे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे हे होते तर, विचारमंचावर लातूर जिल्हा विभागीय नवनियुक्त समन्वयक डॉ.यादव सूर्यवंशी, कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील, डॉ. बब्रुवान मोरे,डॉ. डी. एन. माने, प्रोफेसर डॉ.अभिजीत मोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावर डॉ. माने यांनी मार्गदर्शन केले तर, व्यक्तिमत्व विकास या विषयावर डॉ. बब्रुवान मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही. पेन व फळांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन कांबळे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी मानले. यावेळी स्वयंसेवक विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
