केंद्र सरकारच्या बँक खाजगीकरणा विरोधात दोन दिवस बँक युनियनचा देशव्यापी बंद
बँका बंद अहमदपूरात लाखोंचे व्यवहार ठप्प
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील युनाइटेड फोरम ऑफ बैंक युनियन अहमदपुर युनिटच्या वतीने केंद्रिय अर्थ मंत्री यांनी आयडी बीआय व दोन सार्वजनिक क्षेत्रातील बैंकेचे खाजगीकरणाची घोषणा केली असून खाजगीकरणाच्या विरोधात बँबँकांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून अहमदपूर मध्ये शंभर टक्के बंद यशस्वी करण्यात आला.
बैंक बचाओ देश बचाओ च्या घोषणा देत शहरातील बैंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बैंक, संपात सहभागी होऊन सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी बैंकेसमोर निदर्शने करून जनतेला माहीती व पाॅप्लेट देऊन खाजगीकरणाला विरोध का आहे याची माहिती देत होते कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकाला व व्यावसायीकाला व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन खाजगीकरणाने होणारे नुकसान जनतेचे व ग्राहकाचे बेहाल कसे होतील हे समजाऊन सांगत होते, या संपात सेवानिवृत्त कर्मचारी यांचा देखील सहभाग होता शहरातील बैंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बैंक तसेच हाडोळती, काजळ हिप्परगा येथील आर व्ही परिट, कोळी, केंद्रे, संतोष बिल्ला, गुरमे, मंत्रे, शेळके, बनसोडे, भोगे, अग्रवाल,काजी, शिल्पा उप्परवाड, भगत, एच एल मोठे, मालशे, नल्ले, धमामे, अन्नदाते, विजया स्वामी, दत्तात्रेय मोटे, संतोष कुमार, मालाकर अरूण, गुंडाळे, बेरळीकर, सकनूर, हेंगणे, कोटलवार, सतिष, आधी बँक कर्ज उपचार आणि सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी शहर व तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी आपले व्यवहार बंद ठेवले त्यामुळे ग्राहकांना अडचणीत सामोरे जावे लागले असल्यामुळे आज दिवसभर लाखोंचे व्यवहार ठप्प होते.