महेश अर्बन बँकेची प्रगतीकडे वाटचाल – आ. बाबासाहेब पाटील

महेश अर्बन बँकेची प्रगतीकडे वाटचाल - आ. बाबासाहेब पाटील

कोरोणा महामारीमुळे ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स व्दारे महेश अर्बन बँकेची २७वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न

अहमदपूर ( गोविंद काळे ) : गेल्या एक वर्षापासुन कोरोना महामारीने देशात थैमान घातले असुन अशा कठीण काळातही भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महेश अर्बन बँकेची प्रगतीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

ते अहमदपूर येथे महेश अर्बन बँकेच्या मिटींग हॉलमध्ये ऑनलाईन कॉन्फरन्स व्दारे आयोजित केलेल्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री तथा महेश अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव होते.तर प्रमुख उपस्थितीत अहमदपूर मतदार संघाचे आमदार तथा पणन महासंघाचे चेअरमन बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, संचालक शिवानंद हेंगणे, संचालक आशिष गुणाले, संचालक दिलीप जाधव, संचालक अॅड. विनायकराव भोसले, संचालक सतीश कल्याणे, संचालक अशोक गादेवार, संचालिका सत्यवती कलमे, संचालिका संगीता खंडागळे, संचालक अॅड. भारतभुषण क्षिरसागर, प्र. सरव्यवस्थापक बी.के. क्षिरसागर, सहा.व्यवस्थापक सिद्राम रंदाळे, डेटा सेंटरचे मॅनेजर एस.पी.गडे, एस.आर. महाजन आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, कोरोना महामारीच्या या कठीण काळातही बँकेची सर्व स्थिती पाहुण बँकेला ऑडीट ‘वर्ग अ ‘ मिळाला आहे. तसेच आरबीआय च्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत बँकेची वाटचाल सुरू असुन आर्थिक वर्ष२०१९ -२० यामध्ये बँकेचा एकुण व्यवसाय ४५४ कोटी८३ लाख झाला असुन व्यवसायात ११.०९ टक्के वाढ झाली आहे. बँकेचा आयकर पूर्व नफा १ कोटी ७४ लाख झाला असुन निव्वळ नफा १ कोटी ६ लाख झालेला आहे. बँकेच्या एकुण ठेवी ३०२ कोटी ३६ लाख असुन कर्ज १५२ कोटी ४६ लाख आहे. सी.आर.ए.आर चे प्रमाण १५.५६ टक्के आहे. तसेच कोरोणा महामारीमुळे अडचणी आल्या असल्या तरीही भविष्याच्या काळात बॅक चांगली चालवून महाराष्ट्रात बँकेचे नाव लौकीक करणार असल्याचे यावेळी सांगीतले.आजच्या बँकेच्या प्रगतीत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, ग्राहक यांना श्रेय जाते. असे यावेळी सांगीतले. तसेच आमदार बाबासाहेब पाटील यांची पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल महेश अर्बन बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कोरोना बद्दलच्या सर्व सुचनांचे यावेळी काटेकोरपणे पालन करण्यात आले.
बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांनी अध्यक्षाच्या वतीने बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षीक अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन बँकेचे सहा. व्यवस्थापक सिद्राम रंदाळे यांनी केले तर आभार बँकेचे संचालक शिवानंद हेंगणे यांनी मानले.

About The Author