शास्त्री शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्तीदिन,बालिका दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सेवाज्येष्ठ शिक्षक सुधाकर पोलावार तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळाराम बानापुरे उपस्थित होते. व्यासपिठावर मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांची विशेष उपस्थिती होती.व्यासपिठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याविषयी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाळाराम बानापुरे यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.सावित्रीबाईमुळेच आज स्त्रिया विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.मुलींनी शिक्षणाला महत्त्व देऊन,चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपली प्रगती साधावी. सावित्रीबाई फुले यांनी केशवपण,बालविवाह, विधवा प्रथा या विरोधा त मोठे काम केले त्यासोबतच शिक्षणाच्या क्षेत्रात खूप कार्य केले.त्या काळी मुलीने शिक्षण घेणे मान्य नव्हते.स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे.अशी स्थिती होती.अश्या प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिकवण्याचे काम केले.असे मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नामुळेच आजची महिला घराबाहेर पडत आहे,मुली शाळेत येऊन शिकत आहेत.आज विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.तुम्ही सर्व मुलींनीही खूप अभ्यास करून आपले नाव उज्ज्वल करावे.असे मार्गदर्शन केले, सुत्रसंचलन व आभार सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले.
