लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जंयती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परीषद प्राथमीक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले याच्या प्रतीमेचे पुजन श्रीमती भाग्यलक्ष्मी सुंगधी याच्या हास्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघमारे तर प्रमुख पाहुणे सुषमा तोंडारे,निर्मला वाघमारे होते. यावेळी सावित्रीबाईच्या वेशभुषेत कितीॅ काळे, स्नेहा सुरनर,रोशनी कानुरे,जान्हवी केंद्रे यानी परिधान केले. यावेळी सार्थक चापलवाड,गणेश सुर्वणकार,समर्थ सुरनर,नुरअली शेख,राजनंदनी वाघमारे,सिमरन अन्सारी,मुस्कान शेख, त्रीशा पिट्टलेवाड,सोनाक्षी सुरनर, आलिया शेख,प्रसाद खपरले,राहील शेख,रज्जाक शेख,आदील शेख, अखलाख शेख,अरखाम शेख,यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्याथीॅ पालक उपस्थित होते.
