शिवाजी महाविद्यालय येथील कु.सारडा श्रेया श्रीराम ही विद्यापीठातून सर्वप्रथम
उदगीर (एल.पी.उगीले) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने घेतलेल्या उन्हाळी २०२२ एम कॉम द्वितीय वर्षच्या परीक्षेत कु. सारडा श्रेया श्रीराम ही विद्यापिठातून सर्व प्रथम आली . महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. त्या विद्यार्थिनीला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष नामदेव चामले, प्राचार्य डॉ. विनायक उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे यांनी शुभेच्छा दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने घेतलेल्या उन्हाळी २०२२ च्या एम कॉम द्वितीय वर्ष परीक्षेत विद्यापिठातून सर्व प्रथम आलेल्या या गुणवंत विद्यार्थिनीला मार्गदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ प्रा. ह. वा.कुलकर्णी , प्रा. डॉ डी. बी कोनाळे ,प्रा खरात ,प्रा चिवटे,प्रा. गणेश बेदरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यीनीचे कौतुक केले.
