डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : शालेय विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढावी यासाठी इयत्ता सहावी व नववी वर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक रागिनी बर्दापूरकर व संदीप बोधनकर यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेला इयत्ता नववीतून एकूण 43 विद्यार्थी बसले होते .त्यापैकी 10 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत व दोन विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे, इयत्ता सहावीतून 27 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते . त्यापैकी 15 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त झाले आहे सहावीतून एका विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये इयत्ता सहावी वर्गातील चि. विकास सुधीर कावर तसेच इयत्ता नववीमधून बालाजी लक्ष्मण पाटील व प्रतीक अमोल पंडगे या तीन विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे.
या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,मुख्याध्यापक बाबूराव आडे, उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले ,माधव मठवाले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
