उदयगिरी महाविद्यालयात आयझॅक न्यूटन यांची जयंती साजरी

उदयगिरी महाविद्यालयात आयझॅक न्यूटन यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे सर आयझॅक न्यूटन यांची जयंती साजरी करण्यात आली. भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्ही.पी.पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना विभागप्रमुख पवार यांनी आयझॅक न्यूटन यांनी मांडलेल्या प्रकाश, गती आणि गुरुत्वाकर्षण संशोधन याविषयी माहिती दिली. याप्रसंगी विभागातील प्रा.डॉ.एम.बी.स्वामी, प्रा.डॉ.एम.एस.खांडेकर, प्रा.डॉ.एन.डी.वगशेट्टे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!