ग्रामपंचायत रुद्धा उपसरपंच पदी नाथराव केंद्रे यांची बिनविरोध निवड

ग्रामपंचायत रुद्धा उपसरपंच पदी नाथराव केंद्रे यांची बिनविरोध निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रामपंचायत रुद्धा कार्यालयामध्ये उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून उपाडे साहेब यांची उपस्थिती होती उपसरपंच पदासाठी फक्त नाथराव केंद्रे यांचा एकच नाव आल्याने अधिकाऱ्यांनी नाथराव केंद्रे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवडीची घोषणा केली. सर्व सदस्य ग्रामपंचायत रुद्धा यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदी नाथराव केंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचे सर्व गावकऱ्यांनी पेढे वाटून अनुदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच पदी विराजमान होताच नाथराव केंद्रे यांनी मनोगत व्यक्त करताना संपूर्ण गाव माझे आहे व गावचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी राजकारणात आलो आहे मला फक्त गावच्या विकासात आपल्या सर्वांचे सहकार्य हवे आहे ते कायम राहू द्या व आपण जो विश्वास माझ्यावर्ती टाकला आहे तो सत्यात उतरविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून सर्व उपस्थित जनतेचे आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!