विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे उतूंग यश
अहमदपूर (गोविंद काळे) : क्रीडा व युवा संचनालय पुणे व क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने नांदेड येथे घेण्यात आलेल्या विभागीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत यशवंत विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत उतूंग यश संपादन केले आहे. या स्पर्धेत मुलांमध्ये साईप्रसाद जंगवाड, हर्षवर्धन सोमवंशी , करण गलाले, पृथ्वीराज पाटील यांनी दमदार कामगिरी करत विजय प्राप्त केले. मुलींमध्ये दिव्यांका कदम, आदिती चवळे, साक्षी गोरगीळे, नंदश्री लव्हराळे, स्नेहल वाडकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवत यश प्राप्त केले. या सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल सर्व गुणी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. या खेळाडूंना मार्गदर्शन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलाले सर, मोसिन शेख, आकाश बनसोडे, महफूज खान पठाण, क्रीडा शिक्षक संतोष कदम सर यांनी केले. या सर्वांच्या यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ता गलाले सर, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले सर, उपमुख्याध्यापक कोंडलवाडे सर, पर्यवेक्षक नरडीले सर, गुळवे सर, क्रीडा शिक्षक दीपक हिंगणे, क्रीडा शिक्षिका मिरजकर मॅडम, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
