सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला बचत गटाची सकस आहार रेसिपी स्पर्धा संपन्न

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला बचत गटाची सकस आहार रेसिपी स्पर्धा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 3 जानेवारी वार मंगळवार रोजी माविम जयहिंद cmrc तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माविम बचत गटातील महिलांची सकस आहार रेसिपी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून माविम बचत गटातील महिलांसाठी सकस आहार रेसिपी स्पर्धा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी .एन. केदासे सर (उपजीविका सल्लागार जयहिंद cmrc लातूर) व प्रमुख पाहुणे डॉ. ठोंबरे मॅडम हे उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला बचत गटाची सकस आहार रेसिपी स्पर्धा संपन्न

या घेण्यात आलेल्या रेसिपी स्पर्धेमध्ये गावातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला होता. यात विविध प्रकारचे रेसिपी महिलांनी तयार केले होते व त्या सर्व पदार्थांचे स्पर्धेत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक आश्विनी जनार्दन सूर्यवंशी (नरेंद्र छाया गट), व द्वितीय क्रमांक अर्चना संतोष झरकर (समर्थ जयराम महाराज गट) यांनी मिळविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CRP सुमित्रा बहिर यांनी केले आभार प्रदर्शन सुरेखा आलुरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!