राष्ट्र सेवा दलाच्या वतीने डॉ. राधाकृष्णन शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाने “समता पंधरवाडा साजरा”करण्याचे ठरवले असून यानिमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्याने व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर येथील डॉ.राधाकृष्णन विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी मधून बुंदे श्रावणी महेश (प्रथम),सोमवंशी राजश्री सचिन (द्वितीय), सोमवंशी सावली धम्मदिप (तृतीय), तर इयत्ता सहावी मधून जाधव पूनम संजय (प्रथम), उळागडे अंकिता मल्लिकार्जुन (द्वितीय),शिंदे मिनाक्षी रविकांत (तृतीय), व इयत्ता सातवी मधून गायकवाड संध्या महेश (प्रथम),कांबळे संघर्ष अमोल (द्वितीय),राठोड आरती रामराव (तृतीय) हे स्पर्धक अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ मुडपे गुरुजी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे दिगंबर बुरस्पटे गुरुजी,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अंकुश गायकवाड, अर्जुनराव सोमवंशी गुरुजी, मुख्याध्यापक कोडगिरे ,पुनम घोगरे,कृष्णा स्वामी,दत्ता मुळे,ज्योत्स्ना शेंडगे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
