कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी दिल्या महिला दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चा सत्रास शुभेच्छा

कुलगुरू व प्र-कुलगुरूंनी दिल्या महिला दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय चर्चा सत्रास शुभेच्छा

अहमदपूर ( गोविंद काळे) : जागतिक महिला दिनानिमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले , प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन व मान्यवरांनी शुभेच्छा संदेश पाठवून महात्मा फुले महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा संदेशाचे मराठी विभागातील प्रा. डॉ.अनिल मुंढे यांनी वाचन केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च रोजी आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (ऑनलाइन )च्या माध्यमातून ‘महिला सशक्तिकरण वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्र प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले, डॉ. दीपक बच्चेवार आदी मान्यवरांनी चर्चासत्रास संबंधी आपले शुभ संदेश पाठवून महाविद्यालयाचे कौतुक केले .
आपल्या शुभेच्छा संदेशात माननीय कुलगुरूंनी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे सदरील राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन केले असून, महिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी अशा प्रकारचे राष्ट्रीय चर्चासत्र निश्चितच उपयोगाचे आहे, असेही म्हटले आहे.तसेच आपल्या शुभेच्छा संदेशात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी महात्मा फुले महाविद्यालयाने कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीने महिलांच्या प्रश्नावर राष्ट्रीय चर्चासत्र घेतले, ही बाब अत्यंत महत्त्वाची असून या चर्चासत्राचा सामाजिक विकासासाठी नक्कीच सकारात्मक उपयोग होईल, असे म्हटले. त्यांनीही महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रा. डॉ. अनिल मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले आणि डॉ. दीपक बच्चेवार यांच्याही शुभेच्छा संदेशांचे वाचन केले.

About The Author