अहमदपूर शहराला टँकरने पाणीपूरवठा करा..!
सम्राट मित्रमंडळाची मागणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) :
शहराला सध्या तीव्र पाणी टंचाईने ग्रासले असून प्रशासनाने
टंचाईच्या पाश्र्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना करून शहराला टँकर लावून पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सम्राट मित्रमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,शहराच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसून सध्या उन्हाळ्याचे दिवस सूरू झाले आहात.टंचाईच्या कालावधीत सदरील काम पूर्ण होईल याची शाश्वती नाही.शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असल्याने तरंगती लोकसंख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे वेळेत टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपायोजना नाही केल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.यातून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.ही बाब लक्षात घेता टंचाईच्या पाश्र्वभूमीवर काळात खालील उपाययोजना करून अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रामुख्याने अहमदपूर शहराच्या पाणीटंचाई संदर्भात स्वतंत्रपणे आपल्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावून उपाय योजनेबाबत चर्चा करावी,अहमदपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा कोणताच मार्ग सध्यातरी उपलब्ध नसल्याने तातडीने अहमदपूर शहरासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात टँकर मंजूर करून सदरील टॅंकरचे पाणी संपवेल येथे टाकून नळाद्वारे अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करावा, टंचाईच्या काळात खासगी टँकर वाल्याकडून शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट चालू होते मनमानी टँकर चे भाव लावले जातात करीता खाजगी टॅंकरचे भाडे प्रशासनाकडून तातडीने ठरवून देण्यात यावेत, अहमदपूर शहर व परिसरात असणारे पाण्याचे उद्भव जसे विहीर-बोर इत्यादीचा तातडीने सर्वे करून ठेवावा आणी गरज भासल्यास अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून घ्यावे, अहमदपूर शहरात भूजल सर्वेक्षण विभागाकडून तातडीने बोर घेण्यासाठी स्थळ निश्चित करून घ्यावे, विशेष बाब म्हणून शहरासाठी किमान 50 बोर घेण्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, गफारखान पठाण, जीवन गायकवाड, मोहम्मद पठाण, नूर मोहम्मद, दिलीप भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत..