बनशेळकीच्या उपसरपंचपदी विवेक महाजन यांची बिनविरोध निवड
“सरपंच विकास शेळके यांनी सरपंच पदाच्या पदभार स्वीकारला”
उदगीर (एल.पी.उगीले ) उदगीर तालुक्यातील बनशेळकी गावच्या उपसरपंचपदी विवेक रामचंद्र महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
परवा पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकनिष्ठ एकता पॅनलचा सरपंच विकास शेळके यांच्यासह ९ पैकी ८जागा विजय मिळवल्या होत्या. उपसरपंच निवडी दिवशी विवेक रामचंद्र महाजन यांच्या एकमेव उपसरपंच पदासाठी अर्ज असल्याने त्याची बिनविरोध निवड करण्यात आली.या वेळी निवडणुक निरक्षक अजने व्ही.व्ही.यांनी काम पाहिले. ग्रामसेवक मनोहर जानतिने,यांनी सहकार्य केले.या वेळी लोकनियुक्त सरपंच विकास (नरसिंग) नामदेव शेळके यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या संगीता मनोहर गटोडे, अबुहुजैफ मेहबुब शेख, अंबादास व्यकट चिखलचादे, सुमन उमाकांत सुर्यवंशी,महादेव दिलीप पाटील, महादेवीबाई माहदेव लोहारे,भारतबाई शंकर कांबळे, सुलयाबाई कामाजी कांबळे, ई उपस्थित होते.या वेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच महादेव पाटील, चेअरमन प्रल्हाद महाजन,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रोहिदास लोहारे, मनोहर गटोडे, माजी नगरसेवक महेबुब शेख, सय्यद बबर, मधुकर पांचाळ, विनायक श्रीडोळे, गुरुनाथ आंबेगावे, बालाजी महाजन, नागेश आंबेगावे, कोंडिबा कांबळे,राम हदीखीरे, सुभाष कांबळे,हाणमंत आंबेगावे, नितीन काळे,शिवकात स्वामी,राजेंद्र लोहारे,गुंडाप्पा महाजन, उमाकांत लोहारे, संगम महाजन, बाळु महाजन, सोमनाथ महाजन, राजेश्वर आंबेगावे, भिमाशंकर गटोडे, विनायक महाजन,हाणम़त आंबेगावे, महंमद सय्यद याचयासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीच्या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी महादेव हाडोळे, चंद्रकांत सुतार, श्याम पाटील यांनी प्रशासनाला सहकार्य केले
