क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राचे वाटप

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जीवन चरित्राचे वाटप

इनरव्हील क्लब उदगीरचा उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : स्त्री शिक्षणाचा पाया रोवणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उदगीर इनरव्हील क्लबच्या वतीने महेश प्राथमिक विद्यामंदिर येथील सहावी, सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनींना सावित्रीबाई फुले जीवन चरित्र या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. याच बरोबर इतर ही वाचनीय पुस्तके व शालेय साहित्य देण्यात आले.

३ जानेवारी ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा दिवस बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून ही साजरा केला जातो. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई म्हणजे स्त्री, संघर्ष, सार्मथ्य याचे मुर्तीमंत उदाहरण त्यांनी केलेल्या संघर्षामुळे त्यांनी केलेल्या ज्ञानदानामुळेच आज आपल्या देशातील सावित्रीच्या लेकी यशाची शिखरे गाठत आहेत.शाळेतील या मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास नक्कीच वाचला पाहिजे. जो त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देईल, यासाठी आम्ही या पुस्तकाचे वाटप करत आहोत. असे मत इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले आणि प्रोजेक्ट प्रमुख सौ. तुलसी देशमुख यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानदानाचा वसा अविरतपणे चालवणार्‍या, विविध उपक्रम राबविणार्‍या महेश प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा बिरादार तसेच सहशिक्षिका सौ. निशा भिंगोरे ,सौ. स्वामी एस.एस, सुर्यवंशी एन.आर,सौ. नळगीरे एस.व्ही, पाटील व्ही डी आणि इनरव्हील क्लब उदगीरच्या कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार व सदस्य रोहिणी चाटे,पुजा गर्जे,सौ. योजना चौधरी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!