पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचा जुगार अड्ड्यावर छापा
6 इसम विरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल; 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : याबाबत थोडक्यात हकीकत अशी की ,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यावाही करण्यासाठी निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण हद्दीत अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबवली जात असून सदर मोहिमे अंतर्गत तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 08/01/2023 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या पथकाने महमदापूर शिवारात पाझर तलावाच्या पाळूवर असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. तेथे इसम नामे मनोज यादव गुरमे, (वय 34 वर्ष, राहणार ममदापूर.),देवानंद साधू बनसोडे, (वय 38 वर्ष,राहणार ममदापूर.), दत्ता व्यंकट कुराडे ,(वय 36 वर्ष,राहणार ममदापूर.), राजेंद्र बाळू राव शेळके, (वय 46 वर्ष,राहणार ममदापूर.),कुमार धनंजय गुरमे ,(राहणार ममदापूर.),भैय्यासाहेब रमाकांत बनसोडे,( राहणार ममदापूर.) असे वर नमूद ठिकाणी सदरचे इसम ग्रुप करून स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळीत असताना आढळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम व वाहने असा एकूण 1 लाख 73 हजार 30 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ,आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2023 कलम 12(अ) मुंबई जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पांढरे, पोलीस अमलदार विनोद लखनगिरे, बाबू येनकुरे, सय्यद, महबूब तांबोळी, सचिन चंद्रपाटले, अक्षय डिगोळे, खंडागळे, हजारे यांनी केली आहे.
