देवणी तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी सुनिल पाटिल तर उपाध्यक्ष कृष्णा पिंजरे

देवणी तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी सुनिल पाटिल तर उपाध्यक्ष कृष्णा पिंजरे

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी सुनील शंकरराव पाटील, उपाध्यक्षपदी कृष्णा पिंजरे, सचिव पदी शिवहार बिरादार धनेगावकर, कोषाध्यक्षपदी महेताब सय्यद यांची निवड देवणी तालुका ग्रंथालय संघाची तालुकास्तरीय बैठक तळेगाव भो येथील भोगेश्वर सार्वजनिक वाचनालयात संपन्न झाली. या देवणी तालुका ग्रंथालय संघाची तालुकास्तरीय बैठकीत देवणी तालुक्यातील सर्व ग्रंथालयीन पदाधिकारी व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत राज्य ग्रंथालय संघाच्या जानेवारीत होणाऱ्या अधिवेशनास उपस्थित राहणे आवश्यक बाबत चर्चा झाली.

ग्रंथालय शाळेच्या दारी उपक्रम, देवणी तालुका ग्रंथालय संघाची नूतन कार्यकारणी आदी विषय संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदित्य पाटील व प्रमुख अतिथी म्हणून अनिल पाटील जवळेकर, कार्यउपाध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ लातूर, गुणवंतराव सावंत माजी सरपंच, हैलम्ब येलमटे केंद्रप्रमुख वलांडी, राज गुनाले सरपंच नागतीर्थ वाडी, उद्धव तवडे मुख्याध्यापक जवळगा, आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. तसेच देवणी तालुका ग्रंथालय संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष सुनील शंकरराव पाटील, उपाध्यक्ष कृष्णा पिंजरे, सचिव शिवार बिरादार धनेगावकर, कोषाध्यक्ष महेताब सय्यद, कार्याध्यक्ष शिवाजी बिरादार सर,सदस्य म्हणून उमाकांत बनाळे, प्रवीण पाटील, शशिकांत शिंदे, शंकर रोटे, प्रकाश सोनकांबळे, नवनाथ गरिबे आदी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ने यावेळी देवणी तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!