राजकारणी नेते, कार्यकर्ते यांना पत्रकार दिनाचा पडला विसर
देवनी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी शहरातील नेते, पुढारी , शासकिय कार्याल्यात दर्पन दिनाचा विसर पडलाय की काय ?कामापुरता मामा, ताका पुरती आजी.या म्हणीचा प्रत्यय तालुक्यासह शहरातील काही पत्रकारांना आलेला आहे. एरवी बातमीसाठी संपर्क साधून बातमी घ्यावी, अशी आग्रही भूमिका घेणारे अधिकारी व लोक प्रतिनिधी यांना पत्रकार दिनाचा विसर पडल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. मात्र हीच मंडळी त्यांची बातमी असल्यानंतर दहा दहा फोन करून आठवण करून देतात. अन् ख्याली खुशाली विचारत असतात. सहा जानेवारीला पत्रकार दिन उत्साहात साजरा केला जातो. या दिनाला पत्रकार संघटनांसह सामाजिक व राजकीय संघटना व पक्ष पत्रकारांचा सन्मान करत असतात. या दिनाचा सोहळाही मोठा केला जातो. कोरोनामुळे त्यात निर्बंध आलेले असले तरी यंदाच्या वर्षी निवडणुकांची रणधुमाळी कमी असलेल्या तालुक्यांमध्ये हा पत्रकार दिन साजरा करण्याचा विसर अनेक राजकीय पक्षांना पडलेला दिसून आलेला असल्याची चर्चा आता जनसामान्यांमधून होत आहे. मानसे नाही बोलली तरी समाज माध्यमे मागील घटनांची आठवण करून देत असतात. त्यामुळे हा प्रकार सगळ्यांच्या समोर आलेला असून त्याची चर्चा सुरु झाली आहे. गरज सरो… या म्हणी प्रमाणे राजकीय नेते पत्रकारांचा वापर करीत असल्याची चर्चा सध्या सुरु झालेली आहे. सभेला गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्त्यांवर लाखोची उधळ पट्टी करनाऱ्या राजकीय नेत्यांना मात्र पत्रकार दिनानिमित्ताने त्यांचा सन्मान करण्याचा विसर देवणी तालुक्यात पडलेला दिसून येत आहे. मात्र हीच मंडळी पत्रकारांच्या कार्यक्रमाला येऊन मोठी भाषणे ठोकून निघून जातात. मात्र त्यांच्या सत्कार सोहळ्याला पत्रकारांनी उपस्थित राहून बातमी द्यावी. ही अपेक्षा असते, मात्र दर्पन दिनानिमित्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्याचाही विसर पडला कि काय? असा प्रश्न देवणी तालुक्यातील नागरिकांना व पत्रकारांना उपस्थित होतो आहे.
