आ. विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा – आ संजय बनसोडे

आ. विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा - आ संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) : औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयजी बनसोडे यांनी केले आहे.

शिक्षकांच्या विविध प्रश्नावर विधान परिषदेमध्ये सतत आवाज उठवून त्या प्रश्नांना वाचा फोडणारे, आणि संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय असलेले कार्यसम्राट आ. काळे यांना उदगीर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य देऊन बहुमताने विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन उदगीर येथे शिक्षक मतदार बंधू, भगिनींशी सुसंवाद साधताना आ. संजय बनसोडे यांनी केले.

स्वर्गीय वसंतरावजी काळे साहेब यांचा आदर्श आणि वसा घेऊन कार्यरत असलेले शिक्षकांचे हजारो प्रश्न ज्यांनी मार्गी लावले, असे कार्यसम्राट आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्राला ओळख असलेले आपल्या लातूर जिल्ह्याची शान आणि लातूरकरांचा मान आणखी वाढवण्यासाठी प्रचंड बहुमताने ते विजयी होणारच, त्यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा असायला हवा. शिक्षकांच्या प्रश्नासोबतच महाविकास आघाडीच्या घटकातील सर्वच आमदारांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देणारे आणि विकासासाठी सतत सहकार्य करणारे सर्वांचे बप्पा उर्फ विक्रम काळे साहेब यांना सतत उदगीर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य राहिलेले आहे. त्या मताधिक्यात आणखी वाढ झाली पाहिजे. या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या सर्व घटक पक्षांनी प्रयत्न करावेत.

शिक्षक बंधू आ. विक्रम काळे साहेबांचे काम जाणतातच, त्यांना नव्याने काही सांगायची गरज नाही. खरे तर प्रचंड अभ्यास, विकास आणि शिक्षकांचे प्रश्न याचा गाढा व्यासंग असलेल्या आ. विक्रम काळे साहेबांना बिनविरोध निवडून द्यायला हवे. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून काही राजकीय पक्ष निवडणूक लावत असले तरी आ. विक्रम काळे यांच्या समोर कोणीही टिकणार नाही. विरोधक सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होतील, याची मला खात्री आहे. असा विश्वासही याप्रसंगी आ.बनसोडे यांनी व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करायचा असल्याने संपूर्ण लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिक्षक बंधू, भगिनी मतदारांनी औरंगाबाद येथे आवर्जून उपस्थित रहावे. असेही आवाहन आ. संजय बनसोडे यांनी केले. या अनुषंगाने शिक्षक नेते यशवंत बिरादार, आर.जी. जाधव, प्रवीण भोळे, श्री नाडे, गजानन पाटील यांच्याशी सुसंवाद साधून योग्य असे नियोजन ही याप्रसंगी आ. संजय बनसोडे यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!