अंधाराकडुन प्रकाशाकडे घेवून जाणारी पत्रकारीता असावी – प्रा.बी.व्ही. मोतीपवळे

अंधाराकडुन प्रकाशाकडे घेवून जाणारी पत्रकारीता असावी - प्रा.बी.व्ही. मोतीपवळे

अहमदपूर (गोविंद काळे) : पत्रकारिता ही समाज परिवर्तनाचे सशक्‍त माध्यम असुन देशाच्या जडण-घडणीमध्ये पत्रकारीतीचे मोलाचे योगदान आहे. म्हणुन पत्रकारीता अज्ञानाकडून ज्ञानाकडे म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून जाणारी असली पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ संपादक प्रा.बी.व्ही. मोतीपवळे यांनी केले. दर्पण दिनानिमित्‍त साहित्य संगीत कला अकादमी महाराष्ट्र च्या वतीने पत्रकारांचा सत्कार तसेच ‘दर्पण जीवन गौरव’ आणी ‘दर्पण सेवा गौरव’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते सत्काराला उत्‍तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके पाटील,माजी आमदार वैजनाथ शिदे, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रा.विश्‍वंभर स्वामी,अ‍ॅड.व्यंकट बेद्रे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नृसिंह घोणे, साजीदभाई मित्र मंडळाचे अध्यक्ष सय्यद साजीदभाई,ज्ञानोबा ईप्पर तसेच दर्पण सेवा गौर पुरस्कार प्राप्‍त सत्कारमुर्ती जेष्ठ पत्रकार प्रा.मारोती बुद्रुक पाटील, पत्रकार विनोद निला, जेष्ठ पत्रकार विलास चापोलीकर, भाजपाचे गोविंद गिरी आदींची उपस्थिती हेाती.

पुढे बोलताना प्रा. बी.व्ही.मोतीपवळे म्हणाले की, पत्रकारिता ही निर्भिपणे करणे गरजेचे आहे. आज जरी इलेक्ट्रोनिक मीडियाचे प्रस्त वाढले असले तरी प्रिंट मीडियानी आपली विश्‍वासार्हता अबाधीत ठेवली आहे.पत्रकारीता ही बुद्धीमान माणसाचे क्षेत्र आहे. यासाठी पत्रकारांनी निःपक्षपातीपणे पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकारामध्ये कॉमनसेन्स असणे खुप गरजेचे आहे. पत्रकारांनी समाज, राज्य, राष्ट्र विकासाठी आपली लेखनी चालवली पाहिजे असेही ते शेवटी म्हणाले.
समाजातल्या अन्यायाव तुटून पडावे..! आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु मी असे म्हणेन की, पत्रकारिता हा लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे. त्याच्या भोवती बाकीचे तीन स्तंभ आहेत. म्हणुन लोकशाही भक्‍कम करण्याचे काम पत्रकारिता करत असते. पत्रकारिता हे वाघ आहे. या वाघाने समाजातील विघातक काम करणाऱ्या शत्रुचे नरडे पकडले पाहिजे.आणि समाजाच्या उन्‍नती सामूहिक पणे पत्रकारांनी तुटून पडावे.पत्रकारिता ही येड्या गबाळ्यांचे काम नाही आहे. त्यासाठी पत्रकारितेमधील कार पणा हा सदैव तेवत ठेवणे गरजेचे असल्याचेही ते शेवटी म्हणाले. निःपक्ष पाती पत्रकारीता असावे. यावेळी भाजपाचे पदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके पाटील यांनी सातत्यपूर्ण निष्पक्षपातीपणे पत्रकारीता केल्यास त्यचा दरारा रहातो यातून स्थैर्य सूध्दा मिळू शकते त्यासाठी पत्रकारांनी कायम निःपक्ष पातीचे पत्रकारीता करावी असे प्रतिपादन केले.
विकासाच्या प्रश्नावर पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. तर बब्रूवान खंदाडे यांनी बोलताना पत्रकारांनी नवनवीन साधन संपत्तीचा वापर करून सर्वांच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर घेवून विकासाच्या प्रश्नावर आग्रही भूमिका घेण्याचे अवाहन केले. ग्रामीण भागाचे हे वैभव. माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी पत्रकारांसाठी पुरस्कार आमी त्यांचे सत्कार असे कार्यक्रम ग्रामीण भागात होतात हे आपल्या ग्रामीण भागाचे वैभव असून असे उपक्रम ग्रामीण भागात होत असल्या बद्दल समाधान व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य संगीत कला अकादमीचे अध्यक्ष युवकनेते डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी यांनी करून गेल्या सतरा वर्षा पासून पुरस्कार व सत्काराचा कार्यक्रम अविरतपणे घेत असून यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्वागताध्यक्ष गोविंदराव गिरी यांनी मानले.
यावेळी अहमदपूर-चाकूर तालुक्यातील, परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष गोविंदराव गिरी, प्रशांत जाभाडे, अजय भालेराव,गणेश मूंडे,शरद सोनकांबळे, आकाश सांगवीकर, रवि गायकवाड,मनोज सांनकांबळे, गोरखनाथ सोनकांबळे,राजेंद्र कांबळे, सचिन बानाटे आदींनी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!