मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महेश विसपुते यांना चौथास्तंभ पुरस्कार प्रदान
मुंबई : औरंगाबाद येथील ग्राफिक डिझाईन आणि मांडणी या क्षेत्रात महेश सोनाजी विसपुते ( बिडकर) यांना अप्रतिम मीडीयाचा चौथास्तंभ पुरस्कार नुकताच घोषित झाला,त्याचे वितरण पत्रकार दिनी मुंबई येथे मुंबई मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात अवॉर्ड्स आणि ट्रॉफी स्वीकारताना महेश विसपुते दिसत आहेत.आज शुक्रवारी झाला.
सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक विवेक देशपांडेआदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सयोजन विवेक देशपांडे,अप्रतिम मीडीयाचे संचालक अनिल फळे.सूत्रसंचालन श्रीमती शेटे यांनी केले.
